डॉक्टरांना मारहाण करणार्‍या 25 शिवसैनिकांना शेगावमध्ये अटक

September 4, 2009 10:56 AM0 commentsViews: 2

शेगाव, 4 सप्टेंबर बुलढाण्यातील शेगावमध्ये शारदा गोजरे या महिलेचा डॉक्टरी उपचारानंतर मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी एक्स्पायरी डेट उलटून गेलेलं इंजेक्शन दिल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी डॉक्टरांना मारहाण केली. ज्या सईबाई मोटे हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली त्या हॉस्पिटलचीही मोडतोड केली. यासंदर्भात ज्या शिवसैनिकांनी ही तोडफोड केली त्यांची धरपकड करण्यात आली आहे. सुमारे 25 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला आहे.

close