जसवंत सिंग यांच्या पुस्तकावरील बंदी गुजरात हायकोर्टाने उठवली

September 4, 2009 11:02 AM0 commentsViews: 2

4 सप्टेंबर'जिना-इंडिया, पार्टीशन, इंडिपेंडन्स' जसवंतसिंग यांच्या जिनांवरील पुस्तकावर गुजरात सरकारने घातलेली बंदी गुजरात हायकोर्टाने उठवली आहे. या पुस्तकात जसवंत सिंगांनी जीनांची स्तुती केली आहे. त्यामुळे जसवंत यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर या पुस्तकामुळे सरदार पटेल यांची बदनामी झाल्याचं सांगत गुजरात सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती. या पुस्तकाला पाकिस्तानात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

close