अडवाणी, बच्चन आणि दिलीपकुमार यांना ‘पद्मविभूषण’

January 25, 2015 9:53 PM0 commentsViews:

advani and bacchan25 जानेवारी :देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असणार्‍या पद्म पुरस्कारांची आज घोषणा झाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अभिनेता अमिताभ बच्चन आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय.

तसंच मायक्रोस्फॉटचे प्रमुख बिल गेटस् आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेटस् यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. तसंच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, पत्रकार रजत शर्मा यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सिनेसृष्टीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, लेखक-कवी प्रसून जोशींना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मविभूषण पुरस्कारांच्या यादीत योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचाही समावेश होता. मात्र, शनिवारी रामदेव आणि श्रीश्रींनी पुरस्कार घेण्यास नकार दिला.

 पद्मविभूषण विजेते

 लालकृष्ण अडवाणी
अमिताभ बच्चन
दिलीप कुमार
प्रकाश सिंग बादल

काही पद्मभूषण विजेते
डॉ विजय भटकर
स्वपन दासगुप्ता
रजत शर्मा
वीरेंद्र हेगडे
रामानंदचार्य स्वामी
मलूर रामास्वामी श्रीनिवासन्
कोट्टायन वेणूगोपाळ
करीम अल हुसेनी आगा खान
जहनू बरुआ
डॉ विजय भटकर
स्वपन दासगुप्ता
रजत शर्मा
बिल गेटस्
मेलिंडा गेटस्
डॉ गोकुलोत्सवजी महाराज
अंबरीश मित्तल
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close