राजपथावर महाराष्ट्राची वारी ‘लय भारी’

January 26, 2015 1:45 PM0 commentsViews:

mahawari banner

26 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे लाभल्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक असाच ठरला. विविधतेनं नटलेल्या भारतीय संस्कृतीचा साज राजपथावर अवतारला. काश्मीर ते कन्याकुमारी अखंड भारताच्या संस्कृतीनी नटलेले चित्ररथ मोठ्या दिमाखात सादर झाले. खास म्हणजे, यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ..टाळ, मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाच्या गजरात चित्ररथ सादर झाला. त्यामुळे जणू राजपथावर ‘पंढरी’च अवतरली होती. महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या पंढरीच्या वारीचं दर्शन आज महाराष्ट्राच्या चित्ररथातून घडलं. तसंच राजपथावर पंढरीच्या रिंगणासोबतच अस्सल मराठमोळा गोंधळही रंगला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close