गुगलची सलामी, साकारला प्रजासत्ताक दिनाचा ‘डुडल’

January 26, 2015 1:34 PM0 commentsViews:

google doodle
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने आज (सोमवारी) देशवासियांना ‘डूडल’द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुगल’च्या होमपेजवरील ‘डूडल’मधून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय परंपरा मांडण्याचा या डूडलद्वारे गुगलने प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर प्रत्येक राज्यांच्या संस्कृती दाखवणारे चित्ररथ सादर केले जातात. याचीच प्रतिकृती डुडलमध्ये साकारलीये. डुडलवर इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि या दोघांमध्ये राजपथ दाखवण्यात आलंय. शिवाय राजपथाच्या चहूबाजूंना फुलांनी सजवले असून देशातील विविध राज्यातील पारंपारिक वेशभूषा परिधान करून नागरीक जल्लोष करताना दाखवले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close