होममिनिस्टरफेम आदेश बांदेकरचा शिवसेनेत प्रवेश

September 4, 2009 11:34 AM0 commentsViews: 5

4 सप्टेंबर होममिनिस्टरफेम आदेश बांदेकर याने शुक्रवारी 'मातोश्री'वर शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. होमममिनिस्टर कार्यक्रमातून आदेश घराघरांत 'भावोजी' नावानं लोकप्रिय झाला आहे. त्याची ही लोकप्रियता विधानसभा निवडणुकीत 'कॅश' करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. आदेश बांदेकर यावेळी म्हणाला की, ' लहानपणापासूनच मी शिवसैनिक होतो, त्यामुळे हा प्रवेश नसून औपचारीकता आहे '. शिवशाहीचंच सरकार येणार असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आदेश बांदेकरवर येत्या निवडणुकीत जबाबदारी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

close