महाराष्ट्राचा सन्मान, नगरच्या अमनने केलं NCC पथकाचं नेतृत्व

January 26, 2015 3:05 PM0 commentsViews:

26 जानेवारी : राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात मराठी झेंडाही अगदी मानानं फडकला. महाराष्ट्राच्या दोन युवा तरुणांनी आज संचलन सोहळ्यात आपापल्या तुकड्यांचं नेतृत्व केलं.

160 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एनएनएसचे नेतृत्व मुंबईतील आर. झेड. शहा कॉलेजची विद्यार्थिनी खुशबू जोशीनं केलं.खुशबू आर. झेड. शहा कॉलेजध्ये बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तर 144 कॅडेट असलेल्या एनसीसीचे नेतृत्व करण्याची संधी अहमदनगरच्या अमन जगताप याला मिळाली.

विशेष म्हणजे त्याअगोदर,टाळ, मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाचा गजर करत राजपथावर पंढरी अवतरली होती. महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या पंढरीच्या वारीचं दर्शन आज महाराष्ट्राच्या चित्ररथातून घडलं. पंढरीच्या रिंगणासोबतच अस्सल मराठमोळा गोंधळही रंगला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close