एअर इंडियाच्या विमानाला आग : सर्व प्रवासी सुरक्षित

September 4, 2009 12:20 PM0 commentsViews: 69

4 सप्टेंबर मुंबईतल्या सांताक्रूझ विमानतळावर शुक्रवारी एअर इंडियाच्या एका विमानाला आग लागली. सुदैवानं कर्मचार्‍यांनी ही आग तातडीनं आटोक्यात आणली आणि विमानातले 213 प्रवासी बचावले. एअर इंडियाचं ए-1- 829 हे विमान रियादला जात होतं. टेक ऑफ करत असतानाच विमानाच्या डाव्या इंजिननं पेट घेतला. कर्मचार्‍यांनी कौशल्यानं ही आग विझवली. विमानातील 213 प्रवासी सुरक्षित सुटका करून त्यांना टर्मिनलं कडे नेण्यात आलं. त्यानंतर विमान धावपट्टीवरून बाजूला घेण्यात आलं. विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात आलं आहे.

close