50 टक्के जागा दलितेतरांना देणार – रामदास आठवले

September 4, 2009 2:08 PM0 commentsViews: 8

4 सप्टेंबर रिपब्लिकन ऐक्याच्या वतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये 50 टक्के जागा दलितेतर उमेदवारांकडून लढवल्या जातील, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. रिपब्लिकन ऐक्याची शुक्रवारी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला रामदास आठवले यांच्यासोबर प्रा. जोगेद्र कवाडे, नामदेव ढसाळ हेही उपस्थित होते. निवडणुकीमध्ये SEZ ला विरोध, इरिगेशन, लोडशेडींग हे मुद्दे असतील असंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भुमिका असल्याचं प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं.

close