कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर कारवाईचा बडगा

January 26, 2015 5:46 PM0 commentsViews:

Image img_228122_kol_kdcc_bank_15_34_240x180.jpg26 जानेवारी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी माजी 45 संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँके (केडीसीसी)कडून गेल्या 15 वर्षांमध्ये विनातारण आणि नियमबाह्य कर्जांचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे या बँकेत जवळपास दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार बँकेच्या तत्कालीन संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

बँकेच्या संचालकांवर 147 कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आलीये. तसंच संचालकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आलीये.या 15 दिवसांमध्ये जर संचालकांनी ही रक्कम भरली नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. विशेष म्हणजे या संचालकांमध्ये जिल्ह्यातले राजकीय पुढारीच आहेत. त्यामध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, नरसिंगराव पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, राजू आवळे, भय्या कुपेकर,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. ए. पाटील यांचा समावेश आहे. या संचालकांना नोटीसा पाठवण्यात आल्याअसून त्याबाबत आता संचालक काय भूमिका घेतात याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. यापूर्वी ज्या ज्यावेळी या घोटाळ्याची चौकशी केली जायची त्यावेळी सत्ताधारीच या संचालक मंडळामध्ये असल्यानं अडथळे यायचे पण आता चंद्रकांत पाटील यांच्या आदेशामुळे होणारी ही कारवाई सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई मानली जातेय.

केडीसीसी घोटाळा- कोणाकडे किती रक्कम ?

- माजी खासदार सदाशिवराव मंडलिक – 5 कोटी 54 लाख
– माजी मंत्री हसन मुश्रीफ – 5 कोटी 74 लाख
– माजी मंत्री सतेज पाटील – 2 कोटी 66 लाख
– माजी खासदार निवेदिता माने – 3 कोटी 45 लाख
– माजी आमदार के. पी. पाटील – 5 कोटी 74 लाख
– माजी आमदार नरसिंगराव पाटील – 5 कोटी 74 लाख
– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष – पी. एन. पाटील – 5 कोटी 44 लाख
– भैया कुपेकर – 4 कोटी 90 लाख
– काँग्रेसचे आमदार महादेव महाडिक – 4 कोटी 50 लाख

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close