वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्यावर अत्यंसंस्कार

September 4, 2009 2:36 PM0 commentsViews: 5

4 सप्टेंबर आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्यावर पुलिवेंदुला या त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ख्रिश्चन धर्मानुसार त्यांच्यावर दफनविधी झाले. आपल्या लाडक्या नेत्याला लाखो लोकांनी भावपूर्ण निरोप दिला. हेलिकॉप्टरमधून राजशेखर रेड्डी यांचं पार्थिव हैदराबादहून पुलिवेंदुलामध्ये आणण्यात आलं. त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक पुलिवेंदुलामध्ये वाट पाहत होते. लोकांना आपल्या भावना आवरणं यावेळी कठीण झालं होतं. गर्दीला सामोरं जाऊन रेड्डींच्या पार्थिवाजवळ पोचणं, त्यांच्या कुटुंबीयांसाठीही अवघड बनलं होतं. यावेळी काँग्रेसचे अनेक बडे नेते रेड्डींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

close