ओबामा-मोदींच्या गळाभेटीवर ‘ड्रॅगन’ची ‘आदळआपट’ !

January 26, 2015 8:56 PM0 commentsViews:

barak_obama_in_india26 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर आहेत. रविवारी ओबामांचं दिल्लीत शानदार स्वागत झालं. खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय शिष्टाचार बाजूला सारला आणि स्वत: विमानतळावर जाऊन ओबामांचं स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. पण, मोदी आणि ओबामांची भेट मात्र शेजारील चीनला चांगलीच झोंबलीये. चीनच्या प्रमुख दैनिकांनी मोदी आणि ओबामांच्या गळाभेटीवर आगपाखड केलीये.

बराक ओबामांचा दौरा हा भारताला चीनच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न आहे असा समज चीनचे विश्लेषक आणि दैनिकांनी केलाय.
चीनचे सरकारने वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये या भेटीवर एक खरमरीत लेख प्रसिद्ध झालाय. यात ‘भारताने अमेरिकेच्या जाळ्यात फसू नये’ असा सल्लाच दिलाय. तसंच ओबामा आणि मोदी यांच्या गळाभेटीबद्दल मीडिया उगाच ऊहापोह करत असून यामुळे मीडियाची मागासलेली मानसिकता दिसून येत आहे. आतापर्यंत सरळसरळ एकाच पद्धतीने विचार केला जात आहे याचा फायदा अमेरिका उचलत आहे. अमेरिकेच्या अशा विचारसरणीमुळे चिनी ड्रॅगन आणि भारतीय ‘हत्ती’ एकमेकांच्या विरोधात आहे असं चित्र रंगवलं जात आहे. ग्लोबल्स टाइम्सच्या नुसार चीन आणि भारत एकमेकांच्या विरोधात उभं राहणं योग्य मानत नाही. पण अमेरिकेच्या प्रेमापोटी भारत यात वाहत जात आहे.

ग्लोबल्स टाइम्ससोबतच चिनीच्या इतर दैनिकांनीही या ओबामा-मोदींच्या भेटीवर टीका केलीये. ‘ओबामा आणि मोदींची भेट हा केवळ देखावा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही मतभेद आहे’ असा शोधच चिनी दैनिकांनी लावलाय. चिनच्या शिन्हुआ वृत्त संस्थेचं म्हणते, ‘अमेरिका आणि भारतादरम्यान आतापर्यंतच्या संबंधाची आठवण करून देत दोन्ही नेत्यांचं मैत्रीप्रेम हे खरं नाही. अजूनही दोन्ही देशात मतभेद आहे.’ तसंच या संस्थेचं म्हणणं आहे की, ‘ओबामा आणि मोदींची भेट ही एक तडजोड आहे. ओबामांना भारताची गरज आहे. कारण, ओबामांना यामुळे अमेरिकन राजकारणात आपला वर्चस्व आणखी प्रगल्भपणे सिद्ध करता येईल’. चीनची आगपाखड एवढ्यावरच थांबली नाही. पर्यावरण, कृषी, अणुकरारावर सहमती दाखवली आहे. पण दोन्ही देशातील मतभेदामुळे भारताला मित्र माणणं हे ओबामांसाठी चांगलंच जड जाणार आहे. असंही म्हटलंय.

ओबामांचा दौरा भारतासाठी मोठी घटना, पाक दैनिकांना टिप्पणी

तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या मीडियाने ओबामांच्या भारत भेटीला मोठी घटना आहे असं म्हटलंय. पाकच प्रमुख दैनिक ‘डेली’, ‘टाइम्स’, ‘द न्यूज’ आणि ‘डॉन’ने रविवारच्या आपल्या संपादकीयमध्ये ओबामांच्या दौर्‍याचा उल्लेख केलाय. ओबामांचं प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणं ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्या या दौर्‍यामुळे पाकिस्तान, भारत आणि अमेरिकेमध्ये एक त्रिकोण तयार झालाय असं डेली टाइम्सचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close