दारूबंदीसाठी पुढाकार घेणार्‍या महिलेला विवस्त्र करून मारहाण

January 26, 2015 7:30 PM0 commentsViews:

 baramti daru bandi26 जानेवारी : दारुपायी अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो..हीच जाणिव ठेवून गावात कायमची दारुबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करणार्‍या बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेला एका दारू विक्री करणार्‍या महिलेने व तिच्या मुलाने विवस्त्र करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना प्रजासत्ताकदिनी घडलीये. या प्रकरणात सुरुवातीला फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या रेट्यानंतर या महिलेस मारहाण करणारी पद्मा गव्हाणे, तिचा पती शहाजी व मुलगा अमोल गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या माळेगाव बुद्रुक या गावात अनेक बेकायदेशीर दारुधंदे सुरू आहेत. येथील अनेक कुटुंब दारुपायी देशोधडीला लागली आहेत. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेला यांनी गावात दारुबंदीसाठी पुढाकार घेतला होता. आज त्या प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जात असताना येथील एका दारु विक्री
करणार्‍या महिलेने व तिच्या मुलाने माने यांची दुचाकी अडवून त्याना विवस्त्र करुन मारहाण केलीय.

विशेष म्हणजे या घटनेची फिर्याद घेण्यास माळेगावच्या पोलिसांनी सुरुवातीला नकार दिला होता. मात्र प्रसिद्धीमाध्यमांचा रेटा वाढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार पद्मा गव्हाणे, शहाजी गव्हाणे व अमोल.गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी पीडित महिलेची भेट घेवून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीय.व त्यांनी या महिलेला साडी भेट देऊन आम्ही सर्व स्त्री शक्ती तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close