आठवणीतल्या ‘लक्ष्मण’ रेषा…

January 26, 2015 10:20 PM0 commentsViews:

आर.के.लक्ष्मण यांची निरीक्षणशक्ती अतिशय तीव्र होती. त्यांच्याकडं अफाट आत्मविश्वास होता. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरॅलिसीसचा ऍटॅक आला होता. पण तरीही त्यांनी त्यांचा कॉमन मॅन रेखाटायचा सोडला नव्हता. आपल्या अचूक टिप्पणीतून व्यंगचित्रांमधल्या रेषांमधून त्यांनी तळागाळातल्या घटकांपर्यंत आपलं नातं जोडलं होतं. सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं त्यांना अचूक भान होतं. हे सगळं त्यांच्या कॉमन मॅनमधून व्यक्त होत होतं. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला त्यांनी केलेलं विधान पटायचं म्हणूनच त्यांचा कॉमन मॅन लोकप्रिय ठरला आणि दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणातही राहिला.

पण हा सर्वांचा आवडता, लाडका आणि लोकप्रिय कॉमन मॅन तुमचा आमचा सर्वांचा निरोप घेऊन कायमचा निघून गेलाय आपल्या सगळ्यांना सोडून….आर.के.लक्ष्मण यांना आयबीएन लोकमतच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close