मुख्यमंत्री पदावर रेड्डींचे पुत्र जगनमोहन यांच्या नियुक्तीची मागणी

September 5, 2009 8:29 AM0 commentsViews: 1

5 सप्टेंबरवायएसआर रेड्डी यांच्या जाण्याने आंध्रप्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांची जागा कोण घेणार ही चर्चा सुरू झालीये. राजशेखर रेड्डी यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकार्‍यांनी जगनमोहन रेड्डींना मुख्यमंत्री करण्याची मागणी केलीये.जगनमोहन रेड्डींच्या नावाला आता आंध्रप्रदेशात पाठिंबा वाढू लागला आहे. आणि नुकतेच मुख्यमंत्री झालेल्या के.रोझय्यांनाही याची जाणीव आहे. पण पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असं स्पष्टीकरणही ते देतायत.जगनमोहन रेड्डींच्या बाजूनं जनतेची सहानुभूती आहे. इतर व्यवसायांबरोबरच टीव्ही आणि वृत्तपत्र चालवणार्‍या जगनमोहन रेड्डींकडे राजकारणाचा तसा अनुभव नाही. त्यामुळंच रेड्डींच्या बाजूनं असलेली जनभावना सध्या त्यांच्या शांत होण्याची वाट पाहण्याचा मार्ग पक्षश्रेष्ठी निवडू शकतात. त्यानंतरच या राजकीय पेचप्रसंगावर तोडगा निघू शकेल.

close