रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचं निधन

January 27, 2015 9:59 AM0 commentsViews:

raosaheb shinde27 जानेवारी :  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचं काल (सोमवारी) निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रावसाहेब शिंदे हे विद्यार्थ्यांबरोबरच शेतकरी, कामगार, आदिवासी यांच्याही न्याय हक्कांसाठी लढा देते होते. आज दुपारी दोन वाजता अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रीरामपूरमधील पाडळी गावामध्ये रावसाहेब शिंदे यांचा जन्म झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची धुरा रावसाहेब शिंदे यांनी समर्थपणे पेलली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध उपक्रमही राबविले होते. शिक्षणासोबतच शेती आणि गोपालन या क्षेत्रांमध्ये ते 30 वर्षं सक्रीय होते.

रावसाहेब शिंदे यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close