40 मिनिटांनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा ‘ऑनलाइन’

January 27, 2015 2:09 PM0 commentsViews:

instagram_2411460b

27 जानेवारी : गेल्या काही तासांपूर्वी ‘ऑफलाइन’ झालेली फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल नेटवर्किंग साईट्स 40 मिनीटांनी पुन्हा सुरू झाल्या आहेत.

फेसबुकचा सर्व्हर आज सकाळी 11 वाजून 50 मिनीटांनी बंद पडला होता. या साईट्सवर जाण्याचा प्रयत्न केला असता ‘Sorry something went wrong’ असा संदेश होमपेजवर दिसत होता. भारतासह आशिया आणि अमेरिका खंडातील युझर्सनाही हाच संदेश येत होता. फेसबुकची सेवा बंद झाल्याची व्हॉट्सऍप आणि ट्विटरवर नेटिझन्स चर्चा करत होते. जावळपास एक तासाभरात या साईट्स पूर्ववत झाल्या. या क्रॅशमागील तांत्रिक कारणांविषयी अद्याप फेसबुककडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, 9 जून 2014 रोजी फेसबुकला अशा प्रकारे व्यत्यय आला होता. भारतामध्ये तब्बल 10 कोटींहून अधिक नेटिझन्स फेसबुकचा वापर करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close