सुशीलकुमार शिंदे यांची काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड

September 5, 2009 10:54 AM0 commentsViews: 11

5 सप्टेंबर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सुशीलकुमार शिंदे हे हायकंमाडच्या खास मर्जीतले नेते आहेत. शिवाय येणार्‍या निवडणुकीत दलितांचं मतं आपल्याकडे वळविण्याकरता शिंदेची नियुक्ती केल्याचं म्हंटलं जातय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही सुशीलकुमार शिंदे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रिपब्लीकन ऐक्याच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने हि निवड केली असण्याची शक्यता आहे.

close