जशोदाबेन यांची घरवापसी कधी ?, कामतांचा तोल ढळला

January 27, 2015 6:58 PM2 commentsViews:

kamat on modi27 जानेवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांना अजूनही हक्काच घरं मिळालं नाही. भाजपने जो काही घरवापसीचा कार्यक्रम हाती घेतलाय. त्याअगोदर मोदींनी जशोदाबेन यांची घरवापसी करावी असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी केलंय. कामत एवढ्यावर थांबले नाही तर नव्याने आलेल्या स्मृती इराणींनी पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मंत्रिपद आणि सरकारी बंगला दिला जातो मात्र,जशोदाबेन यांना आजही रिक्षाने प्रवास करावा लागतो अशी मुक्ताफळंही कामत यांनी उधळली.

मुंबई काँग्रेसनं मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढलाय. काँग्रेसचे मुंबईचे शहराध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा आझाद मैदानात मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य आंदोलन केलं. आंदोलनाचं रूपांतर नंतर जाहीर सभेत झालं. या सभेनंतर काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी मीडियाशी संवाद साधत असतांना मुक्ताफळं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ते सहा वेळा निवडणूक लढले असतील. पण लोकसभेत जेलमध्ये जाण्याच्या भीतीने पहिल्यांदाच त्यांनी आपल्या पत्नीची जाहीर कबुली दिली. एकीकडे नव्याने आलेल्या स्मृती इराणी यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद आणि सरकारी बंगला दिला जातो. पण त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांना आजही रिक्षाने जावं लागतं. त्यांना पुरावण्यात आलेले सुरक्षारक्षक हे गाड्याने फिरतात. पण, जशोदाबेन यांना रिक्षा आणि बसने प्रवास करावा लागतोय अशी बोचरी टीका कामत यांनी केली. तसंच आज मोदी महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारता पण आपल्या पत्नीला हक्काच घरं देऊ शकत नाही. देशाच्या जनतेला काय संदेश द्यायचाय. भाजपने जो काही घरवापसीचा कार्यक्रम हाती घेतलाय. पहिले मोदींनी आपल्या पत्नी जशोदाबेन यांची घरवापसी करावी असं वादग्रस्त वक्तव्यच कामत यांनी केलं. गुरुदास कामत यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    जशोदाबेन या त्यांचा ईछे ने बस-रिक्षा ने फिरतात, सामान्य जनते प्रमाणे. देशा चा पंतप्रधाना च्या पत्नी जर सर्व-साधारण जाणते प्रमाणे समाजात वावरणार असेल तर ह्याहून मोठी गोष्ट काय? यान हेच दिसत कि त्यांची नाळ ही जनते शी जुळलेली आहे, Sonia-Rahul-Priyanki Gandhi na Jamnare ka Hey?

  • dattatray jadhav

    वास्तविक हा कॉंग्रेसने दखल आणी टेन्शन घेण्याचा प्रश्न नाही. यापेक्षाही जनहिताचे अनेक प्रश्न गेली ६५/७० वर्षापासून प्रलंबित आहेत त्यासाठी या नेत्यांनी आपला वेळ आणी ताकद खर्च केली तर बरे होईल. कारण कोणीही कोणाच्याही वैयक्तिक जीवनात डोकाऊ नये हेच चांगले. आणि असेच अनेक प्रश्न कॉंग्रेस नेत्यानाही विचारले जाऊ शकतात हेही त्यांनी ध्यानात घ्यावे.

close