क्षुल्लक कारणावरुन ड्रायव्हरला जिवंत पेटवले

January 27, 2015 8:42 PM0 commentsViews:

CrimeScene227 जानेवारी : पुण्यात क्षुल्लक कारणावरून हडपसरमध्ये कार ड्रायव्हर अनिल क्षीरसागर यांना जाळून मारण्यात आलंय. अनिल क्षीरसागर असं या घटनेतील मृत ड्रायव्हारच नाव आहे.

क्षीरसागर यांनी कर्जाऊ घेतलेले पाच हजार रुपये परत केले नाहीत आणि ते कामावर गेले नाहीत, म्हणून धंनजय घूले या कार मालकाने पेटवून दिलं. यात ते 90 टक्के भाजले. त्यांना ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपींवर ऍट्रॉसिटी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे शहरातल्या वेगवेगळ्या संघटनानी बंड गार्डन पोलीस स्टेशनसमोर चक्का जाम आंदोलन केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close