एकाच वेळी पाच बाळांना जन्म

September 5, 2009 10:59 AM0 commentsViews: 7

5 सप्टेंबरठाण्यातल्या मीरा-भाईंदर भागात राहणार्‍या उबेद खान आणि साबिरा हे दांपत्य एकाचवेळी पाच बाळांचे आई-बाबा झाले आहेत. साबिरानं पाच मुलांना एकाच वेळी जन्म दिला. वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारची डिलव्हरी एक आव्हान मानलं जातं. अंधेरीतल्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये सध्या या नवजात बाळांवर उपचार सुरु आहेत. अंबानी हॉस्पिटलमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने हे सिझरींग केलं. ही सर्व बालकं सध्या नीओ-नॅटल ICUमध्ये ऍडमिट आहेत. पुढचे दोन महिने त्यांना आयसीयूमध्ये ठेवावं लागणार आहे. यापैकी दोन बाळांची प्रकृती क्रिटीकल आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. तर उरलेल्या तीन बाळांना ऑक्सिजनवर ठेवलंय. उबेद आणि साबिराला याआधी दहा महिन्यांचा एक मुलगा आहे. एकाचवेळी पाच बाळांना सुखरुप जन्म देणारी भारतातली ही पहिलीच घटना आहे. याआधीच्या चार घटनांमधली बालकं वाचू शकली नव्हती. तर जगभरातली एकाचवेळी पाच बाळांना जन्म दिलेली ही 17 वी घटना आहे. अंबानी हॉस्पिटलच्या टीमने या सर्जरीच्या तयारीसाठी ड्रीलही केलं होतं. एरवी बाळांचं जन्माच्यावेळी असलेलं वजन हे तीन किलो असतं, मात्र ही बाळं 29 आठवड्यांची आहेत, म्हणजेच प्री-मॅच्युअर्ड बेबीज् असल्यानं त्यांचं वजन 800 ग्रॅम इतकं आहे.

close