अनामी रॉय यांची निवडणूक डीजी म्हणून नियुक्ती

September 5, 2009 11:43 AM0 commentsViews: 7

5 सप्टेंबरनिवडणूक काळात अनामी रॉय यांची इलेक्शन डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डीजी एस.एस.विर्क पंजाबमध्ये डीजीपी असताना निवडणूकीच्या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यातून ते सहीसलामत बाहेरही पडले. गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळीही विर्क यांच्याऐवजी सुप्रकाश चक्रवर्ती यांच्याकडे निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अनामी रॉय यांची निवडणूक डीजी म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाची परवानगी मागितली होती. आयोगाने परवानगी दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. मात्र भाजपाने या नियुक्तीला विरोध केला आहे.

close