कर्मचार्‍यांनी लावले ठुमके, उधळल्या नोटा !

January 27, 2015 11:12 PM0 commentsViews:

kdmc_worker27 जानेवारी : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये मुख्यालयात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. गणेशोत्सवासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी वर्गणी काढली. पण ही वर्गणी नृत्यावर उधळण्यात आल्याची शर्मची बाब समोर आलीये.

गणेशोत्सवानिमित्त पालिका कर्मचार्‍यांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला. यावेळी कर्मचारीही बेभान झाले आणि त्यांनी नाचत नोटा उधळल्या. या बाबतची क्लिप क्षणार्धात सोशल मीडियावर झळकल्यानंतर गणेश भक्तांमध्ये संतापाचं वातावरण आहे. केडीएमसी कर्मचार्‍यांच्या या हिणकस प्रकारामुळे तमाम डोंबिवलीकरांचा मान नक्कीच शरमेनं खाली गेली असणार..कारण या शहराला सुसंस्कृतपणाची मोठी पंरपरा आहे. असं असतानाही पालिकेच्या डोंबिवली वार्डातले कर्मचारी मागी गणेशोत्सवाच्या नावाखाली हा असा धिंगाणा घालत असतील याला काय म्हणावं…हेच समजत नाहीये म्हणून झाल्या प्रकाराबद्दल आयबीएन लोकमत काही सवाल उपस्थित करू इच्छितंय.

आयबीएन लोकमतचे सवाल

माघी गणेशोत्सवात पैसे उधळले
मागी गणेशोत्सवात पैशांची उधळण कशासाठी ?
पालिका कर्मचार्‍यांना पैसे उधळणं शोभतं का ?
पैसे उधळणारे कर्मचारी मद्यधुंद नसतील कशावरून ?
केडीएमसीचे आयुक्त दोषी कर्मचार्‍यांना निलंबित करणार का ?
केडीएमसी पालिकेचे पदाधिकारी या प्रकाराबद्दल गप्प का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close