बाळासाहेब ठाकरे विरोधात भोजपूर कोर्टाने बजावलं अटक वॉरंट

September 5, 2009 11:48 AM0 commentsViews: 97

5 सप्टेंबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बिहारमधल्या भोजपूर कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात उत्तर भारतियांच्या विरोधात लिखाण केल्याबद्दल हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. भोजपूरचे सब-डिव्हिजन मॅजिस्ट्रेट राकेश तिवारी यांनी बिहारींचा अपमानस्पद लिखाण केल्याबद्दल बाळासाहेबांना 7 जुलै 2009 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, बाळासाहेबांच्या वतीने कोर्टात कोणीच हजर न राहील्याने हे अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. सामनामध्ये बिहारींविषयी आणि छट पूजेबद्दल वापरलेली भाषा अपमानास्पद होती, असा आरोप ऍडव्होकेट राजेशकुमार सिंग यांना कोर्टासमोर आपल्या तक्रारीत केला होता.अटक वॉरंटविषयी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांच्याशी संपर्क साधला असता कोर्टाची नोटीस आल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल असं सांगितलं आहे.

close