अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

January 28, 2015 3:40 PM0 commentsViews:

28 जानेवारी :    पूर्व अमेरिकेला ज्युनो या मोठ्या हिमवादळाने गारठवलं आहे. अनेक ठिकाणी 3 फुटांपर्यंतचा हिम वर्षाव झाला आहे.आणि यामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे. या हिमवादळाविषयीचा आपला अंदाज चुकला अशी कबुली अमेरिकन हवामान खात्याने दिली आहे. हे वादळ विनाशकारी असेल असं अमेरिकन वेधशाळेने म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात या वादळाची तीव्रता कमी आहे. कनेक्टिकट आणि मॅसेच्युसेट्समध्ये या हिमवादळामुळे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. पण न्यू यॉर्कमध्ये मात्र याचा फारसा तडाखा बसलेला नाही. न्यू यॉर्कची सबसे सेवा तब्बल 10 तास बंद ठेवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close