वाडा -आयसीसीची बैठक ऑक्टोबरमध्ये

September 5, 2009 12:41 PM0 commentsViews: 3

5 सप्टेंबरवाडाच्या ऍण्टी डोपींग करारासंबधीची बैठक आयसीसीने ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 5 सप्टेंबरला ही बैठक होणार होती. बुधवारी आयसीसी पुरस्कारांची नामांकनं जाहीर करण्यात आली. याच सोहळ्यात आयसीसीचे सीइओ हरून लोगार्ट यांनी हे जाहीर केलं. आसीसीनं नेमलेल्या समितीच्या ऐवजी आता आयसीसीचं थेट वाडाशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं समजतं. आयसीसीच्या इतर सभासदांकडूनही बीसीसीआयला पाठींबा मिळाला आहे. खेळातल्या ड्रग्जच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या आयसीसीच्या लढ्याला बीसीसीआयनंही पाठींबा दिला. पण ऑफ सिजमध्ये चाचणी घेण्यावर मात्र त्यांचा आक्षेप आहे. ही बैठक आता 6 आणि 7 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

close