सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी अमरसिंहांची चौकशी

January 28, 2015 6:01 PM0 commentsViews:

amar singh428 जानेवारी : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणाला आज एक वेगळं मिळालं. आज (बुधवारी) एसआयटीने समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांची चौकशी केलीये. दिल्लीच्या एसआयटी टीमने सुमारे दोन तास अमर सिंह यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांना 20 प्रश्न विचारण्यात आले.

आयपीएल घोटाळ्याबद्दल शशी थरुर यांना पाठीशी घालण्यासाठी सुनंदा पुष्कर यांनी स्वतःवर आरोप घेतले होते, असा दावा अमर सिंह यांनी केला होता. थरुर यांची काही दिवसांपूर्वीच चौकशी झालीय. त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल असं कळतंय. त्याचबरोबर सुनंदा यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close