बाळासाहेबांची ‘प्रेरणा ज्योत’ २ कोटींची,पालिका उचलणार खर्च !

January 28, 2015 7:10 PM0 commentsViews:

balasaheb_perna joyet28 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणा ज्योतीवरून वाद सुरू झालाय. बाळासाहेबांच्या या अखंड ज्योतीसाठी मुंबई महापालिका सर्व खर्च करणार आहे. या ज्योतीला अखंड तेवत ठेवण्यासाठी तब्बल 2 कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. या संदर्भात शिवसेना महापालिकेतल्या स्थायी समितीत प्रस्ताव करणार आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमीत्त शिवाज पार्कवरील स्मृती स्थळावर अखंड ज्योत सुरू करण्यात आलीये. पण ही अखंड ज्योत जनतेच्या पैशातून साकारण्यात आलीये. या ज्योतीचा संपूर्ण खर्च पालिकेनं केला असून वर्षाला 2 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा सगळा खर्च आता महापालिका उचलणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिलीये.

आज होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना हा प्रस्ताव मंजूर करुन घेणार आहे. या प्रेरणा ज्योतीची संपूर्ण देखभाल महानगर गॅस, भारत पेट्रोलियम करणार असून त्याचा खर्च महापालिका उचलणार आहे. त्यामुळे असं करुन शिवसेना लोकांची फसवणूक करतेय अशी टीका महापालिकेचे विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांनी केलीय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close