या खेळाडूंचा ठरणार हा अखेरचा वर्ल्ड कप !

January 28, 2015 7:22 PM0 commentsViews:

यंदाचा वर्ल्ड कप हा अनेक देशांतील खेळाडूंसाठी शेवटचा वर्ल्ड कप ठरणार आहे. पाहुयात कुणाकुणासाठी हा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे. टीम इंडियाचा डॅशिंग कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने नुकतीच कसोटी सामन्यात निवृत्ती जाहीर केलीये. धोणीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा वर्ल्डकप जिंकलाय. त्यामुळे वर्ल्ड कप नंतर जर धोणीने निवृती जाहीर केली तर आश्चर्य वाटू नये. याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्क, पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदी, न्यूझीलंडचा डेनियल विटोरी, आयरलँडचा कॅप्टन विलियम पोर्टरफिल्ड, पाकिस्तानी कॅप्टन मिस्बाह उल हक आणि खेळाडू युनिस खान, तसंच श्रीलंके च्या टीममधील तिलकरत्न दिलशान, लसिथ मलिंगा, महेला जयवर्धन आणि कुमार संघकारा यांचाही हा अखेरचा वर्ल्ड कप ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close