एअर इंडियाचे दोन पायलट निलंबित

September 5, 2009 1:51 PM0 commentsViews: 6

5 सप्टेंबर एअर इंडियानं आपल्या दोन पायलटना कामावरून काढून टाकलं आहे. मंुबई एअरपोर्टवर शुक्रवारी रियाधला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वी अचानक पेट घेतला होता. पण कर्मचार्‍यांनी आग तातडीनं विझवल्याने अपघात टळला आणि विमानतल्या 213 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग लागल्याबरोबर कर्मचार्‍यांनी विमानाचे दरवाजे उघडले होते. यामुळे उड्या मारून प्रवाशांचा जीव जाण्याची भीती होती. सुरक्षेचे निकष विमान कर्मचार्‍यांनी धाब्यावर बसवल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तर कर्मचार्‍यांनी अतिशय उत्तम काम केल्याची पावती एअर इंडियाचे प्रवक्ते जितेंद्र भार्गव यांनी दिली आहे.

close