अखेर बाबासाहेबांचं लंडन येथील घरं खरेदीची प्रकिया सुरू

January 28, 2015 8:18 PM0 commentsViews:

babasaheb_home28 जानेवारी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये वास्तव्यास असलेलं घर खरेदी करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. राज्य सरकारनं लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांना याबाबतचं इरादापत्र दिलंय. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांमार्फत राज्य शासन ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत इरादापत्र पाठवलंय.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1921-1922 असे दोन वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास होते. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी डी.एस.सी पदवी संपादन केली. लंडनमध्येच बाबासाहेबांनी बॅरिस्टर पदवीही मिळवली. या काळात बाबासाहेबांनी लंडनमधील किंग हेनरी रोड येथील एका घरात वास्तव्य केले होते. ही ऐतिहासिक वास्तू घरमालकाने 40 कोटी रुपयांत लिलावात काढली होती. ही बाब लंडन इथं कार्यरत असलेल्या फेडरेशेन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गेनायझेशन या संघटनेच्या सदस्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राज्य सरकारने घरं खरेदी करण्यासाठी हालचाल सुरू केली. अखेरीस ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलीये.  राज्य सरकारनं हे खरं 35 कोटींना खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. याबद्दल आता लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी इरादापत्र पाठवलंय. घर खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया आपण सुरू करावी. यासाठी लंडनमधलं प्रशासनंही सहकार्य करेल अशी आशा आहे असं इरादापत्रात म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन महामानवाचं सातासमुद्रापार स्मारक उभारलं जाणार आहे. राज्य सरकारने येत्या 14 एप्रिल अर्थात आंबेडकर जयंती दिनी हे घरं खुले करणार असा दावा केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close