विद्यार्थ्यांची लाखमोलाची मदत

January 28, 2015 10:05 PM0 commentsViews:

28 जानेवारी : भांडुपमधल्या अमरकोर विद्यालयाच्या 2000 विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल एक लाख पस्तीस हजारांपेक्षा जास्त निधी जमा करून डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला दिला. डॉ. प्रकाश आमटे हा चित्रपट पाहिल्यानंतर ही कल्पना त्यांना सुचली. चित्रपट बघितल्यावर विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे, सहलीचे पैसे आणि काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या वाढदिवसाचे पैसे देखिल जमा करून सव्वा लाखाहून जास्त मदत या प्रकल्पाला देऊ केलेत. ही मदत त्यांनी डॉ. प्रकाश आमटे या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांना तसंच लोकबिरादारी प्रकल्पाच्या सदस्यांना विशेष समारंभात प्रदान केले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close