देवनार कत्तलखाना मुंबईबाहेर हलवणार ?

January 28, 2015 11:39 PM0 commentsViews:

deonar ftg28 जानेवारी : आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला देवनारचा कत्तलखाना आता मुंबईच्या बाहेर हलवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राज्य सरकार याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं समजतंय. डहाणूच्या पुढे पाच हजार एकर जागेवर देवनारचा कत्तलखाना हलवला जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील देवनार इथं 1971 साली हा कत्तलखाना स्थापन करण्यात आला होता. तब्बल 61 एकर जागेवर हा अवाढव्य कत्तलखाना उभारण्यात आलाय. या कत्तलखान्यात दररोज हजारो बकरी, बैल, डुक्कर यांची कत्तल होत असते. खासकरून राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून प्राण्यांची इथं आवक होते. या देवनार कत्तलखान्यातून मुंबईला ताजं मांस पोहचवलं जातं. दर शनिवारी इथं मोठा बाजार भरत असतो. विशेष म्हणजे ईदच्या निमित्ताने इथं सर्वात मोठा बाजार भरत असतो. एवढंच नाहीतर कत्तलखान्यातून मांसही निर्यात केलं जातं. मध्यंतरी अनेक कारणांमुळे देवनार कत्तलखाना वादात सापडला होता. आता हा कत्तलखाना मुंबई बाहेर हलवण्याचा सरकार विचारधीन असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close