संजय घाडी मनसेतून शिवसेनत

September 7, 2009 8:40 AM0 commentsViews: 6

7 सप्टेंबरमनसेचे सरचिटणीस आणि कोकण विभाग संघटक संजय घाडी यांनी रविवारी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना यांनी शिवसेनेत गेले. संजना मनसेच्या महिला विभाग संघटक होत्या. गेल्या काही दिवसांपासून संजय घाडी मनसेत अस्वस्थ होते. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत त्यांना दिंडोशी मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट हवं होतं. मात्र राज यांच्या नातेवाईक असलेल्या शालिनी ठाकरेंना दिंडोशीचं तिकीट मिळणार, असं जवळपास निश्चित झाल्याने घाडी यांनी पक्ष सोडला. राज ठाकरेंसोबत काम करत असलेल्या काही मोजक्याच जवळच्या लोकांपैकी संजय घाडीे एक मानले जात होते.

close