लवकरच 20 हजार नोकर्‍या उपलब्ध होणार – मुख्यमंत्री

January 29, 2015 11:32 AM0 commentsViews:

1

29 जानेवारी : डाव्होस येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये भारताबाबत सकारात्मक वातावरण होतं, तसंच अनेक कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी मुंबई आणि पुण्यात 2 डेटा सेंटर उभारणार असून आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉग्निझंट पुणे शहरात भव्य प्रकल्प उभा करणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 20 हजार नोकर्‍या उपलब्ध होणार असल्याचा फडणवीस यांनी सांगितलं आहे.

जीई इलेक्ट्रिक कंपनी 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रामुख्याने डॉएच बँक, जेपी मॉर्गन, नोमुरा फायनान्शियल सव्हिर्सेस, स्विस ऍग्रिकल्चर फायनान्सिंग या कंपन्यांनी मुंबईमध्ये गुंतवणुकीसाठी तत्परता दर्शविली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डाव्होस आर्थिक परिषदेबाबत माहिती देताना काय काय म्हणाले फडणवीस

1. कॉग्निझंट या कंपनीला पुण्यामध्ये जमीन हस्तांतरणाचे पत्र देण्यात आलं. येत्या काही वर्षामध्ये तिथं 20,000 नोकर्‍यांची निर्मिती होईल

2. लिफ्ट आणि एस्कलेटर्सची निर्मिती करणार्‍या शिंडलर्सचा प्रस्ताव वर्षभरापासून पडून होता. तळेगावमध्ये दुसर्‍या टप्प्यात एस्कलेटर्सच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यास कंपनी राजी

3. कागद निर्मिती करणारी व्हिसी ही ऑस्ट्रेलियन कंपनीनं कागदाच्या पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक… पुढच्या चर्चेसाठी फेब्रुवारीमध्ये मुंबईला येणार

4. जनरल इलेक्ट्रिकल्स या कंपनीचा महाराष्ट्रात 3,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा इरादा…

5. टोरे इंटरनॅशनल ही कंपनी टेक्निकल फायबर्स आणि पॉलिस्टरच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक… अमरावती/ नागपूरमध्ये गुंतवणूक करावी अशी विनंती करण्यात आलीये.

6. हिल्ती ग्रुपही राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक… राज्यातल्या पायाभूत सुविधांबाबत समाधानी पण ऊर्जा खर्चाबाबत त्यांना आक्षेप आहे

7. सॅफ्रॉन ही फ्रान्समधली कंपनी विमानं आणि रॉकेट इंजिनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीतली कंपनी.. त्यांना नागपूरमध्ये जमीन देऊ केलीये.

8. फोक्सवॅगन ही लहान कारची निर्मिती करण्यासाठी भारत आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक..

9. दियाजिओ ही कंपनी महाराष्ट्रातला उद्योग विस्तारण्यास उत्सुक.. या कंपनीला उद्योगासाठी पुष्कळ पाणी लागते, त्यामुळे पाणी जास्त ठिकाणी असलेल्या जागेची विनंती करण्यात आलीये.

10. खिमजी ग्रुप इंजीनियरिंग क्षेत्रात प्रकल्प उभारण्यास इच्छुक… 3 वर्षांपासून सरकारशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील…

11. क्रेडिट सुझ या कंपनीला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विस्ताराच्या योजनेसाठी मुंबई आणि पुणे या शहरांना त्यांचं प्राधान्य…

12. नोमुरा ही वित्तीय क्षेत्रातली कंपनी राज्यातल्या मनुष्यबळावर समाधानी आहे, त्यांनाही व्यवसाय वाढवायचाय. त्यांचे प्रमुख केंद्र मुंबईत आहे

13. जे.पी. मॉर्गन ही कंपनीही राज्यात उद्योग विस्तार करत आहे.

14. नेस्ले ही कंपनी दूध व्यवसायात गुंतवणूक करण्यास उत्सुक.. राज्याला जगात आघाडीचा निर्यातदार करण्याचा कंपनीचा इरादा

15. मित्सुई ही कंपनी उत्पादन तसंच वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे.

16. जेट्रो या जपानी संस्थेची जपानी कंपन्या भारतात येण्यास उत्सुक असल्याची ग्वाही… उत्पादन, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमधल्या कंपन्यांशी चर्चा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close