गडचिरोलीतील बीनागुंडात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकला तिरंगा

January 29, 2015 8:55 AM0 commentsViews:

Gadchiroli

29 जानेवारी :  महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात बीनागुंडा गावात नक्षलवाद्यांना झुगारून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या या धाडसी पावलाला ग्रामस्थांनी साथ देत या ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली होती.

गडचिरोली जिल्ह्यातील बीनागुंडा हे गाव म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. घनदाट जंगलातल्या या गावात नक्षलवाद्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे गावात नक्षलवाद्यांची दहशत आहे. त्यातूनही पोलीस आणि नक्षलवादविरोधी पथकाने यंदा अत्यंत नियोजनपूर्वक या भागात ध्वजारोहणाचा कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरू केली. ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले आणि अखेर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीनागुंडातील आश्रमशाळेत कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close