अंधश्रद्धेतून एका विवाहितेचा बळी, आरोपी मोकाट

January 29, 2015 1:43 PM0 commentsViews:

crime scene

29 जानेवारी :  अंधश्रद्धेतून एका विवाहितेचा बळी गेल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. प्रतिभा जाधव या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रतिभा करणी करते असं सांगत तिची सासू तिचा छळत करयची, असा आरोप प्रतिभाच्या नातेवाईकांनी केली आहे. प्रतिभाने आत्महत्या केली नसून, तिचा घातपात केला असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कोर्टाने फटकारल्यानंतर गंगापूर पोलिसांनी प्रतिभाच्या सासरच्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पण अजूनही आरोपी मोकाटचं आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++