ज्येष्ठ बुद्धीबळपटू भाऊसाहेब पळसलगीकर यांचं निधन

September 7, 2009 8:52 AM0 commentsViews: 6

7 सप्टेंबर ज्येष्ठ बुद्धीबळपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते भाऊसाहेब पळसलगीकर यांचं सोमवारी पहाटे सांगली इथे वृद्धापकाळाने निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. बुद्धीबळपटू म्हणून नॅशनल स्तरावर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. आपलं अखंड आयुष्य त्यांनी बुद्धीबळ खेळाच्या प्रसारासाठी वेचलं. लहान मुलांना या खेळाची गोडी लागावी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. सांगलीत आपल्या राहत्या गावी त्यांनी नूतन बुद्दीबळ मंडळ स्थापन केलं होतं. या मंडळातर्फे गेली 42 वर्षं ते बुद्धीबळ शिबिरं भरवत होते. वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदही अनेकवेळा या शिबिराला आवर्जून हजर राहायचा. राज्यसरकारने त्यांना दादोजी कोंडदेव आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सांगलीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

close