जरा याद करो कुर्बानी…

January 29, 2015 4:02 PM0 commentsViews:

शहीद कर्नल मुनींद्र नाथ राय यांच्या पार्थिवावर आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात हिजबुलच्या अतिरेक्यांशी लढताना एम. एन. राय 27 जानेवारीला शहीद झाले. त्यांना आदल्याच दिवशी प्रजासत्ताक दिनाला शौर्य पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना वीरमरण आलं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होताना त्यांच्या कुटुंबाबरोबरच लष्करानेही त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुलं आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close