दहावीची परीक्षा सुरू असताना शाळेत लग्नकल्लोळ

January 29, 2015 8:35 PM0 commentsViews:

amlner_school29 जानेवारी : परीक्षा सुरू असताना सहसा शाळेमध्ये आणि परिसरात शांतता असते पण अंमळनेरमध्ये मात्र वेगळाच प्रकार पहायला मिळाला. इथं विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ती डीजेच्या आवाजाच्या साथीनं…इतकंच नाही तर एकेका बेंचवर चक्क तीन ते चार विद्यार्थी पेपर सोडवायला बसले होते. याचं कारण म्हणजे या मुलांची परीक्षा सुरू असताना या शाळेच्या आवारात धुमधडाक्यात लग्न सुरू होतं.

अमळनेरमध्ये नगरपालिकेच्या या उर्दू शाळेच्या आवारासोबतच वर्गखोल्या आणि व्हरांडेही या लग्नासाठी भाड्यानं देण्यात आले होतं. त्यामुळे एकीकडे रिकामे असलेल्या वर्गांमध्ये परीक्षा सुरू होती, तर दुसरीकडे ही लग्नाच्या जेवणाची तयारी…पेपर लिहीण्यासाठी या मुलांना पुरेसे वर्गच नसल्याने एकाच वर्गात कोंबून मुलांना परीक्षा द्यायला लावत आहे. काही ठिकाणी तर मुलांना जमिनीवर बसून पेपर सोडवायला लागले. पण शाळेच्या बोर्डाचं प्रशासन, अधिकारी, शिक्षण सभापती यांनी मात्र आपण शाळेमध्ये लग्नाला परवानगी दिलीच नाही, असा दावा केलाय. तर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी फोन केल्यामुळेच शाळा लग्नासाठी द्यावी लागली असं शिक्षकांचं म्हणणं आहे. खरंतर शाळा सुरू असताना कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्यानं शाळा देता येत नाही असा नियम आहे. पण इथं तर सर्रास नियम धाब्यावर बसवल्यानं या मुलांची खरीखुरी परीक्षा झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close