अमेरिका गोठली

January 29, 2015 11:08 PM0 commentsViews:

ज्युनो या हिमवादळाच्या पूर्व अमेरिकेला चांगलाच तडाखा बसलाय. अनेक ठिकाणी 3 फुटांपर्यंतचा हीम वर्षाव झाला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे. या हिमवादळाविषयीचा आपला अंदाज चुकला अशी कबुली अमेरिकन हवामान खात्याने दिली आहे. हे वादळ विनाशकारी असेल असं अमेरिकन वेधशाळेने म्हटलं होतं, पण प्रत्यक्षात या वादळाची तीव्रता कमी आहे. कनेक्टिकट आणि मॅसेच्युसेट्समध्ये या हिमवादळामुळे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. पण न्यूयॉर्कमध्ये मात्र याचा फारसा तडाखा बसलेला नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close