मुख्यमंत्री विदर्भातील असताना शेतकरी का मरताहेत?, उद्धव यांचा सवाल

January 30, 2015 11:45 AM1 commentViews:

Uddhav and fadnavis11

30  जानेवारी :  विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केले आहे. ‘मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भाचे आहेत तरीही शेतकरी का मरत आहे? हे सरकारला शोभणारे आहे काय?’ असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र ‘सामना’तून केला आहे.

विदर्भात एकाच दिवशी पाच शेतकर्‍यांनी कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येवरुन फडणवीस सरकारचे कान टोचले. मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथे उद्योग परिषदेत देशाचे नेतृत्व करत असतानाच विदर्भातील शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन जीवन संपवावे हे भयंकर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विदर्भाचे सुपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या जीवनास नवी उभारी येईल अशी आशा सगळ्यांनाच होती आणि आहे.पण प्रत्यक्षात तसं काहीच होताना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांकडे मोबाईल फोनही नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिलं भरता पण कर्जाचे हफ्ते फेडत नाही असे या शेतकर्‍यांना विचारता येणार असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    Mr. Fadnavis is CM of Maharashtra. Mr Udhav did you ask same question why only farmers from vidarbha do suicides, in prior government CM were from west maharashtra? no suicides from west maharashtra?

close