सुशीलकुमार शिंदेंच्या निवडीने गटातटाच्या राजकारणाला चाप

September 7, 2009 11:39 AM0 commentsViews: 1

5 सप्टेंबर काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडं सोपवली आहेत. शिंदे यांना या पदावर नेमून काँग्रेस हायकमांडने एकप्रकारे गटातटाचं राजकारण करणार्‍या नेत्यांना चपराकच दिली आहे. उमेदवारी मागणारे इच्छुक आपापला बायोडेटा आणि नेत्यांची शिफारसपत्रं घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेतआहेत. इच्छुकांची यादी जेवढी मोठी तेवढीच बंडखोरीची शक्यता जास्त. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढलीय. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय जसा लांबणीवर जातोय, तसा स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार वाढतोय. अशा वेळी निवडणूक प्रचाराची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 2004 ची निवडणूक काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. आणि सत्ता काबीज केली होती. यावेळीही त्यांचा पक्षाला मोठा फायदा होईल, असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. सुशीलकुमार शिंदे यांची निवड करून हायकमांडनं गटातटाचं राजकारण करणार्‍या अनेक मोठ्या नेत्यांना शह दिलाय.

close