विधानसभेची मतमोजणी 15 किंवा 16 ऑक्टोबरला

September 7, 2009 12:07 PM0 commentsViews: 2

7 सप्टेंवरमहाराष्ट्राच्या विधानसभेची मतमोजणी 15 किंवा 16 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे अशी खात्रीलायक माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. या आधी ही मतमोजणी 22 ऑक्टोबरला होणार होती. मात्र, यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी निवडणूक आयोगानं महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला नाही. बुधवारी मुख्य निवडणुक आयुक्त महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहेत. तेव्हा याची अधिकृत घोषणा होऊ शकते. मतमोजणी दिवाळी आधी व्हावी, अशी मागणी अनेक राजकिय पक्षांनी निवडणुक आयोगाकडे केली होती. महाराष्ट्रासोबतच अरुणाचल प्रदेशमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तिथला प्रदेश डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे हे अंतर ठेवल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची मतमोजणी अरुणाचलसोबतच करायचं का? याचं उत्तर मात्र निवडणूक आयोगाकडे नाही. म्हणूनच महाराष्ट्रात मतमोजणी 22 ऑक्टोबरच्या आधी होऊ शकते का, यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला अन्य दोन निवडणूक आयुक्तही उपस्थित होते.

close