सत्ता द्यायची तर पूर्ण द्या – राज ठाकरे

September 7, 2009 3:07 PM0 commentsViews: 12

7 सप्टेंबरमला अर्धीमुर्धी सत्ता नको, देणार असाल तर पूर्ण द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय. सोमवारी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग त्यांनी फुंकलं. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी परप्रांतीय आणि मराठी माणूस यांच्या नात्याचं राजकारण उलगडून दाखवलं. तसंच विधानसभा निवडणुकीची रणनिती स्पष्ट केली. ' गेल्या निवडणूकीत आम्ही 9 लोकसभेच्या मतदार संघामध्ये विधानसभेच्या 11 ठिकाणी पहिल्या नंबरला होतो, तर 13 ठिकाणी दुसर्‍या नंबरला होतो. त्यामुळे आम्ही याशिवाय 10 – 15 जागांवर लक्ष केंद्रीत करतोय '. अश्या प्रकारे राज ठाकरे यांनी आपली रणनीती स्पष्ट केली. परप्रांतीय महाराष्ट्रात प्रगती होते म्हणून इथे आले, ते इथे आले म्हणून प्रगती नाही झाली असा दावाही त्यांनी केला. टॅक्सीवाल्यांच्या बाबतीतही त्यांची भूमिका कायम आहे. ' इकडे इकडे जायचंय. नही आने का हे असं उत्तर ऐकल्यावर तुम्ही काय म्हणणार ? नही आनेका है तो नही आना है !, खरंतर त्यांच्या कानाखाली फाडकन आवाज काढला पाहीजे " अशी त्यांनी आपली परप्रांतियांविषयीची भूमिका स्पष्ट केली. मराठी माणसाचा विषय हा सुशिक्षित आणि अशिक्षित असा विषय नाही तर तो विषय रागाचा आहे, अस्मितेचा आहे. हे बभान झालेले जे हत्ती आहेत त्यांच्यावर कोणाचाही अंकूश नाही, त्यांच्यावर कोणीही माहूत नाही, त्यांच्या वरती लक्ष कोणी ठेवायचं. या सगळ्यासाठी मी रस्त्यावरती तर आहेच. पण विधानसभेतही पाहीजे म्हणून हा लढा आहे. असंही राज यांनी या मुलाखतीत म्हटलं. राज ठाकरेंसोबतची हि खास बातचीत 8 सप्टेंबर, मंगळवारी साडेनऊ वाजता आणि दुसरा भाग 9 सप्टेंबर बुधवारी रात्री 9.30 वाजता आयबीएन-लोकमत न्यूजचॅनलवर पाहता येईल

close