भारताचा खेळ खल्लास, इंग्लंड फायनलमध्ये

January 30, 2015 5:39 PM0 commentsViews:

india vs england330 जानेवारी : वर्ल्ड कपअगोदरच टीम इंडियाचा फुगा फुटला आहे. ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव झालाय. शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडने भारताचा 3 विकेटनं धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करणार्‍या टीम इंडियानं इंग्लंडसमोर विजयासाठी 201 रन्सचं टार्गेट ठेवलं. इंग्लंडने चोख उत्तर देत विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान आज पर्थ येथील वाका मैदानावर अटीतटीचा सामना रंगला. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि इंग्लंडच्या बॉलर्सनं टीम इंडियाला चांगलेच दणके दिले. पुन्हा एकदा भारताची टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरली. अजिंक्य रहाणेची 73 रन्सची शानदार खेळी वगळता एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. पण तळाला आलेल्या मोहम्मद शमीने 25 रन्सची फटकेबाजी करत भारताला 200 चा टप्पा गाठून दिला. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 201 रन्सचं आव्हान उभं केलं होतं. 201 धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडने सावध सुरुवात केली खरी पण भारतीय बॉलर्सनी इंग्लंडची टॉप ऑर्डरला हादरा दिला. पण तरीही टेलरच्या 82 आणि बटलरच्या 67 रन्सच्या चिवट भागीदारीने इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. इंग्लंडने भारताला पराभूत करत ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारली. आता यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ट्राय सीरिज विजेत्यासाठी सामना रंगणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close