‘उसासाठी आता ठिबक सिंचन बंधनकारक’

January 30, 2015 7:12 PM0 commentsViews:

cane prots30 जानेवारी : राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतलाय. उसाखालचं क्षेत्र टप्प्याटप्प्यानं ठिबक सिंचनाखाली आणण्याची अधिसूचना जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. मुख्यमंत्र्यांनी नाबार्डशी बोलताना आज ही घोषणा केलीये.

उसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. विशिष्ट मुदतीच्या आत सरकार  निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या आधीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अशीच घोषणा केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची अमंलबजावणी करतील का हे पाहण्याचं ठरेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close