IBN लोकमतवर गुन्ह्याची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

January 30, 2015 7:29 PM0 commentsViews:

cm on depcm3430 जानेवारी : मुंब्रा इथं मुस्लीम तरुणाला मारहाण प्रकरणी आयबीएन लोकमतवर दाखल झालेल्या गुन्ह्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी जे गुन्हे दाखल झालेत त्याची चौकशी करू असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तसंच मुंब्य्रात घडलेल्या घटनेच्या विषयात खोलात जाण्याची गरज आहे, ते आम्ही करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात जिहादसाठी नकार दिला म्हणून मोहम्मद शेख या तरुणाला काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केली होती एवढंच नाहीतर त्याच्या गाडीची तोडफोडही केली होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर मोहम्मदच्या घरी जाऊन या लोकांनी जिहादची धमकी दिली होती असा आरोप शेख कुटुंबियांनी केलाय.

याप्रकरणाला आयबीएन लोकमतने वाचा फोडली. मात्र, आम्ही असं काही केलंच नाही असा कांगवा करत उलट आयबीएन लोकमतवरच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या जबाबात मोहम्मदने स्पष्ट खुलासा केलाय मात्र पोलीस अजूनही चौकशी करत आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी जे काही गुन्हे दाखल झाले आहे, त्याची पूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

==================================================================================

संबंधित बातम्या

जिहाद विरोधी तरूणाची व्यथा दाखवल्यामुळे IBN लोकमतवर गुन्हा दाखल

 

जिहादसाठी नकार दिला म्हणून युवकाला बेदम मारहाण

 

आम्ही दबावाला बळी पडणार नाही !

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close