राज्यपालांच्या दौर्‍यासाठी आदिवासी गाव चकाचक

January 30, 2015 8:38 PM0 commentsViews:

nashik_governar30 जानेवारी : ‘राज्यपाल येती गावा, तोचि दिवाळी दसरा…’अशी अवस्था होती नाशिकमधल्या नागलवाडी या गावाची. राज्यपालांच्या भेटीनिमित्तानं या ठिकाणी आदिवासी विकासाचा देखावाच सरकारनं उभा केला आणि आदिवासी विकासाचा खरा मुद्दा या बडेजावात कुठल्या कुठे विरून गेला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमित्त राज्यपाल विद्यासागर राव नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यानिमित्तानं त्यांनी आदिवासींची परिस्थिती जाणून घेण्याचा मनोदय व्यक्त केला. मग काय प्रशासन लागलं कामाला. नागलवाडीसारखं नाशिकजवळचंच गाव निवडण्यात आलं. आंगणवाडी, रस्ते, पिण्याचं पाणी रात्रीत रंगरंगोटी झाली. आदिवासींशी थेट संवाद साधण्याचा राज्यपालांचा मनोदय होता. पण प्रोटोकॉलच्या अवडंबनात खर्‍या आदिवासीचं खरं म्हणणं मात्र पुरतं दबून गेलं.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close