सांगली-मिरज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

September 8, 2009 9:47 AM0 commentsViews: 3

8 सप्टेंबर सांगली- मिरज येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी संध्याकाळी सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्याचबरोबर भाजप नेते गोपिनाथ मुंडे, विनोद तावडे, विरोधी पक्षनेते रामदास कदम उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मिरजमधल्या गणेश मंडळाचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी शाम वर्धने यांनी जनतेला शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. लोकांनी सहकार्य केल्यास कर्फ्यू शिथील करण्याचं त्यांनी आश्वासनही त्यांनी दिलं आहे. लोकांनी आपल्यामुलांना पोलिसांवर दगडफेक करण्यापासून रोखावं असं आव्हानही त्यांनी केलं आहे. तसेच सांगलीचे एस. पी. कृष्णप्रकाश यांनी सांगितलं कि दंगलखोरांवर पहिल्याचं दिवशी कारवाई करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आला नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आव्हान केलं आहे.

close